Thursday, April 2, 2009

कधी कधी ......

प्रत्येकाच्या आयुष्यात हे क्षण कधी ना कधी येतातच! काहीवेळा तर क्षणोक्षणी येतात. अशावेळी काय करायच, काही सुचत नाही आणि मेंदू काही काम करत नाही. जगात काही उरलच नाही आणि आता काय होणार काय कळतच नाही.
हुषार डोक्यांना कळलच असेल, अस कधी होत ते. अशा वेळी आपण म्हणतो की “मी Frustrate झालो!” (हा शब्द आजवर मी कधी मराठीत लिहीला नसल्यामूळे टाइप करता आला नाही, क्षमस्वः) अजुन वेगळ्या प्रसंगी सूध्दा या फीलींग्ज येतात! असो, तो एक वेगळा विषय आहे!
मी याला “General Frustration” म्हणतो. याला येण्यासाठी काही कारण लागत नाही. फास्ट जाणारी एखादी गाडी, अचानक ब्रेक लागल्यावर जशी रस्ता सोडून स्किड होते अगदी तसच काहितरी होत आपलं! सगळं व्यवस्थित चाललय, आयुष्याची गाडी सरळमार्गी चालतेय, आँफिसची हमाली व्यवस्थित चाललीय, गर्लफ्रेंड (असली तर) त्रास देत नाहियेय, आठवड्यात एकदा बाहेर जेवण, एक मूव्ही, एक पार्टि, सगळं सुखात आहे! आणि ‘तो’ क्षण येतो! सगळ एगदम चेंज!
अशावेळी मला माझी किव येते. काय कारतोय आपण? आपलं ध्येय काय? काय होणार या आयुष्याच? प्रचंड चीड येते. वाटत की आयुष्य फुकट चाललय. मी असाच मरत मरत जगणार आणि एक दिवशी खरोखरचा मरणार....
मग ‘तोसूध्दा’ क्षण येतो! मनात क्रांतीकारी विचार नाचू लागतात... वेगवेगळ्या कल्पना सुचू लागतात...नवनविन दिशा दिसू लागतात. क्षितीजावर नवी पहाट उगवते... मनाला एक नवी उभारी मिळते... आयुष्य परत हवहवसं वाटत! या क्षणांत ती ताकद असते... आयुष्य बदलण्याची! राखेतून भरारी घेण्याची!! जग जिंकण्याची!!!
प्रत्येकाच्या आयुष्यात हे क्षण सूध्दा येतातच! यावेळी मी सुपरहिरो बनतो. वाटत की आपल्यासाठी काहिच अशक्य नाही. पण अशावेळी सूध्दा काय करायच, काही सुचत नाही. कळतं पण वळतं नाही. विचार करण्यातच वेळ निघून जातो आणि हे क्षण वाळूसारखे हातातून निसटून जातात. कारण हे क्षण एकटे काहिच नाही करू शकतं...त्यांना साथ हवी असते...दुर्दम्य जिद्दीची...अपराजित आत्मविश्वासाची...
परत एकदा सामान्य आयुष्य सूरु होतं. हे चक्र असच चालु रहातं. या हिंदोळ्यांवर आयुष्य झुलत रहातं. पण हीच तर खरी मजा आहे जगण्याची. कारण हे क्षण एक आशा देतात...सगळ्यां अडथळ्यांवर मात करायची! पूढे जाण्याची!! आणि कधी कधी त्यांना हवी ती साथही मिळते!!! जर हे क्षण नसते तर सगळं एकसूरी असतं. ज्याचं-त्याचं नशीब अगदी फिक्स असतं! No competitions, no ambitions! Winner is born winner and loser is born loser!!
पण असाच एखादा क्षण, कधी कधी येतच रहातो...

1 comment:

  1. One of the such moments must have pushed you to write blog!

    ReplyDelete