(तमाम प्रेमीजनांची माफी मागून...)
हा विषय थोडा डेंजरस आहे. Many of you will agree! माणूस प्रेमात ‘जात’ नाही, ‘घुसत’ नाही किंवा ‘सामील’ होत नाही, तर प्रेमात ‘पडतो’. आता ज्या गोष्टीत सुरूवातीलाच ‘पडायचं’ आहे, ती गोष्ट डेंजरस असलीच पाहीजे. (काहीजण नुसतेच पडत नाहीत, तर आपटतात.)
प्रेमाचे अनेक प्रकार आहेत, जसं मातृप्रेम, बंधुप्रेम, मित्रप्रेम इ. पण हे प्रेम कोणतं, हे सांगायची काही गरज नाही. प्रेमाचा हा प्रकार इतका पाँप्युलर आहे की यापुढे बाकी सगळे प्रेमप्रकार आपोआप अल्पसंख्यांक ठरतात. या प्रेमाचेही बरेच उपप्रकार पडतात :-
शारिरीक प्रेम, शब्द थोडा विचित्र वाटतो, पण हा प्रेमाचा एकदम रोकठोक प्रकार. या एकाच प्रकारात, आपल्याला समोरच्या पार्टिकडून नक्की काय पाहिजे याबद्दलच्या संकल्पना एकदम क्लीअर असतात. बाकी याविषयी सर्वांना व्यवस्थीत माहिती असल्यामुळे आणि हा Blog, ‘फक्त प्रौढांसाठी’ नसल्यामुळे याविषयी सविस्तर माहिती देता येत नाही.
प्रेमाचा दुसरा प्रकार अगदी याच्या विरूद्ध, निखळ/ भावनिक/ शुद्ध प्रेम. यात दोन्ही बाजू कन्फ्युज असतात. आपल्याला नक्की काय पाहिजे याबद्दल दोघांच्याही मनात सारखी चलबिचल चालू असते. या प्रेमात काही ना काही तीढा असतो. थोडक्यात काय, यांच शुभमंगल होणं, जवळपास अशक्य असतं. त्यामुळे त्यांना नाइलाजाने आपलं प्रेम शुद्ध आणि निखळ ठेवावच लागत!
प्रेमाचा सर्वात आढळणारा प्रकार, एकतर्फी प्रेम. नावाप्रमाणे यात सगळं ट्राफिक वन-वे! कधी कधी समोरच्या पार्टिला याचा थांगपत्ताही नसतो. एकतर्फी प्रेमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, एकतर्फी प्रेम कधीच सफल होणार नाही, हे माहित असताना सूद्धा लोक यात पडतात आणि मग रडतात. एकतर्फी प्रेमात आपटलेले प्रेमवीर मग, आपलं असं कधी नव्हतचं किंवा त्या पोरीचंच नशीब कसं खराब, इ. दाखले देतात. (याला मराठीत “कोल्ह्याला द्राक्ष आंबट” असं म्हटलं जातं.)
प्रेमाचा अजून एक विषेश प्रकार, महान प्रेम. पण प्रेम महान होण्यआधी आधी बरेच निकष पार पाडावे लागतात. हे प्रेम जालीम समाजात कधीही स्वीकारले जाता कामा नये. या प्रेमाची शेवटी शोकांकिताच झाली पाहिजे. दोघांमधून किमान एकजण प्रेमात हुतात्मा झाला/ झाली पाहिजे. आणि मग ४००-४५० वर्षांनी या मर्त्य जगाला जाणीव होते की ते प्रेम महान होतं! उदा. सलीम-अनारकली, लैला-मजनू, रोमिओ-ज्युलिएट, देवदास-पारो इ. त्यामुळे आज-कालचे हुशार प्रेमवीर महान प्रेम करायच्या भानगडीत पडत नाहीत. हा प्रेमप्रकार हल्ली चीत्त्यांसारखा नामशेष झाला आहे.
प्रेमाचा एक फारच वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे, प्रथमदर्शनी (@ first sight) प्रेम. हे प्रेम शारिरीक असू शकतं (बहुतेक वेळा), भावनिक असू शकतं (नाइलाजास्तव), किंवा एकतर्फीपण असू शकतं. (एकतर्फी प्रेम बहुतेक वेळा प्रथमदर्शनी होतं!) एखादा माणूस प्रथमदर्शनी प्रेमात ‘पडला’ की, त्याच्या कानात घंटा, हार्मोनियम, तबला, ढोल, गिटार, सतार, एकतार, झांजा, टाळ इ. वाद्य वेगवेगळी किंवा एकत्र वाजतात. On-the-spot माणूस वेडा होतो. एकंदरीत डोक्यात ‘केमिकल लोचा’ होतो. असो.
प्रेमाचे अजून बरेच प्रकार/ उप-प्रकार आहेत, जसं आंधळ प्रेम, वेडं प्रेम, गरिब/श्रीमंत प्रेम वगैरे, वगैरे. पण ते तेवढेसे महत्वाचे नाहीत.
प्रेमवीरांचे ढोबळमानाने दोन प्रकार पडतात. प्रोफेशनल आणि हौशी. दोघांत महत्वाचा फरक एकच. प्रोफेशनल प्रेमवीराला प्रेमाच्या चक्रव्युहात कसं शिरायचं याबरोबर त्यातून सहीसलामत बाहेर कसं पडायचं याचं उत्तम ज्ञान असतं. अर्थात त्यामागे अनेक वर्षांची तपश्चर्या आणि मेहनत असते. हौशी प्रेमवीर मात्र आगीची परिक्षा पहायला जातात आणि शेवटी त्यांचा ‘अभिमन्यु’ होतो.
प्रेम करण्यासाठी काही प्री-क्वालिफिकेशनस् अत्यंत महत्वाची आहेत, विषेशतः पुरूषांसाठी,
Ø काहीही विषय नसतांना फोनवर तासनतास बोलणं.
Ø रोजच्यारोज “माझं तूझ्यावर किती प्रेम आहे” हे पूराव्यानीशी पटवून देणं.
Ø दरवेळी तास, दोन तास न थकता, न कंटाळता वाट पहाणं, कारण कोण तरी कवी फार पूर्वी “प्यार में इंतजार बहोत जरूरी है” असं सांगून गेलाय आणि ते अखिल स्त्रिजातीला पटतं.
Ø निमुटपणे शाँपिंगची/ हाँटेलची बीलं भरणं. (मुलगी कितीही कमवत असली, तरी बाँयफ्रेंड बरोबर असताना स्वतः बील भरण्यात तीला भयंकर अपमान वाटतो.) इ. इ.
स्त्रियांसाठी एकच प्री-क्वालिफिकेशन गरजेचं आहे, ते म्हणजे, पुरूषांकडून या सर्व गोष्टी बिनबोभाट करून घेता येणं! एकदा का दोन्ही बाजूंना हा समझौता मान्य झाला की मग प्रेमाची गाडी आपोआप पुढे सरकते.
प्रेमाला ‘प्रेमरोग’ असही म्हणतात. हा रोग जनरली एकटाच येत नाही, बरोबर नीद्रानाश, डोकेदूखी, मानसिक संतुलनाचा अभाव, तणाव, फस्ट्रेशन, डिप्रेशन अशा अनेक रोगांचं फ्री पँकेज घेउन येतो. मला नेहमी एक प्रश्न पडतो, जर प्रेमाचा आणि ह्रदयाचा (दिल!!!) फार जवळचा संबंध आहे, तर प्रेमरोगाला ‘ह्रदयरोग’ का म्हणू नये? असो.
तर आता प्रेम वगैरे सगळं करून झालं की प्रश्न येतो ‘लग्नाचा’. प्रेमप्रकरण घरच्यांपर्यंत पोहेचतं. प्रेमात पडलेल्या ९९% पोरींचे बाप खत्रुड असतात. त्यांना आपली पोरगी ‘ऐश्वर्या’ आणि बिचारा पोरगा ‘सलमान’ वाटतो. (मुलाकडच्यांना आपला पोरगा ‘अभिषेक’ आणि पोरगी ‘राणी’ वाटते.) तरीही मुलाकडचे तसा थोडा समंजसपणा दाखवतात. आपल्या कार्ट्याचं कुठेतरी जमलं, यातच त्यांना समाधान असतं. वरून पोरगी श्रीमंताची असली तर फायदाच फायदा आणि नसली तर आम्ही पूढारलेले! असो. लग्न हा एक वेगळा विषय आहे.
असं हे प्रेम! आजवर कित्येक लेखक-कवींचे संसार प्रेमावर तरून गेले. कित्येक शाहरुख, सलमान, आमिर, ह्रितिक इ. करोडोंपती बनले. भारताने लोकसंख्येचा विक्रम केला. लव्हगुरूला रोज रात्री करायला टाइमपास मिळाला आणि मला ‘गप्पायण’साठी विषय मिळाला!
आपल्याकडे एक डायलाँग फार पुर्वीपासून फेमस आहे, “आयुष्यात एकदा तरी प्रेम करून बघितलचं पाहिजे!” ज्या कोणी लिहीला, त्याने प्रेमात किती आपट्या खाल्ल्या असतील?
Subscribe to:
Post Comments (Atom)
So seems your on the verge of doing PHD in this subject.
ReplyDeleteSo how many trials or experiences you had had before writting this one?
Zakas !! Mitra Todlas :)
ReplyDeleteHa Ha Po Du...
Great,
ReplyDeleteyou have writers streak in you.
I am very very impressed